Kalyan : मार्गशीष असूनही फुलांचे दर वधारले,आवक घटली पण फुलं महागली ABP MAJHA

Continues below advertisement

मार्गशीर्ष महिन्यात फुलांना मोठी मागणी असते. पण यंदा फुलांचे भाव दुपटीनं वाढलेत. त्यामुळे कल्याणच्या फूल बाजारातील निम्म्या गाळ्यांना तर टाळं लागलंय.  अवकाळी पावसामुळे नगर, पुण्यातील फुलशेतीचं नुकसान झालंय. त्यामुळे फुलांची आवक घटली... परिणामी दर वाढले. मार्गशीर्ष महिन्यात ५० ते ६० रुपयांनी मिळणारा झेंडू १०० ते १२० रुपये प्रतिकिलोनं विकला जातोय. तर गुलाबाचं बंडलही १०० रुपयात विकलं जातंय. परराज्यातून येणाऱ्या फुलांवरच आता शहरी भागातील व्यापाऱ्यांची भिस्त आहे. तर ऐन मार्गशीर्ष महिन्यात फुलांचे भाव वधारल्यानं ग्राहकांच्या खिशाला कात्री बसतेय. आणि अवकाळी पावसामुळे आपल्या राज्यातील फूल उत्पादकांचं मोठं नुकसान झालंय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram