Kalyan Crime: 'पोलिसांचा धाक उरलाय का?' पोलिसांसमोरच गावगुंडांचा घरात घुसून हल्ला, महिलांना मारहाण!
Continues below advertisement
कल्याणमधील मोहने गावात फटाके खरेदीच्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या तुफान राड्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेत पोलिसांच्याच समोर गावगुंडांनी महिलांना मारहाण करून घरांवर दगडफेक केली. एका स्थानिक पत्रकाराच्या म्हणण्यानुसार, 'पोलिसांसमोर हा हल्ला घडत होता. पोलिसांनी देखील अडवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांना देखील धक्काबुक्की त्या ठिकाणी केलेली आहे'. रात्रीच्या सुमारास सुमारे 60 ते 70 गावगुंडांच्या जमावाने लहुजी नगरमध्ये घुसून हा हल्ला केला. या हल्ल्यात संध्या साठे नावाच्या तरुणीने धाडस दाखवत जमावाला एकटीने रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र या झटापटीत ती जखमी झाली. या घटनेत एकूण नऊ ते दहा जण जखमी झाले आहेत. पीडितांनी तक्रार दाखल करण्यास गेल्यानंतरही पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली नसल्याचा आरोप केला जात आहे, ज्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement