Kalyan Crime: 'माझ्या दोन वर्षाच्या भाचीवर 307 चा गुन्हा दाखल केला', महिलेचा पोलिसांवर गंभीर आरोप
Continues below advertisement
कल्याणमधील (Kalyan) मोहने गावात फटाक्यांच्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या राड्यानंतर (Clash) पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी संध्या साठे (Sandhya Sathe) यांनी पोलिसांवर पक्षपातीपणाचा आणि गुंडांना पाठिंबा दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. 'माझ्या दोन वर्षाच्या भाचीवरती खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी (Attempt to Murder) गुन्हा दाखल केला आहे', असा खळबळजनक आरोप साठे यांनी केला आहे. फटाके खरेदीच्या किरकोळ वादातून सुरू झालेल्या या प्रकरणाचे रूपांतर मध्यरात्री दगडफेक आणि मारहाणीत झाले, ज्यात अनेक महिला जखमी झाल्या. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही गटांवर गुन्हे दाखल केले आहेत, मात्र पीडित कुटुंबाने पोलिसांच्या तपासावर अविश्वास दाखवला आहे. न्यायालयात सुनावणीवेळी वकिलांनी दोन वर्षांच्या मुलीवरील गुन्ह्याची बाब न्यायाधीशांच्या निदर्शनास आणून दिल्याचेही या प्रकरणातून समोर आले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement