Kalyan Assault | रिसेप्शनीस्ट मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट, CCTV ने बदलले चित्र! Special Report
Continues below advertisement
कल्याणमधील रिसेप्शनीस्ट मारहाण प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. यापूर्वी रिसेप्शनीस्ट तरुणीला मारहाण झाल्याचा सीसीटीव्ही समोर आला होता. मात्र, आता एक नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यात रिसेप्शनीस्टनेच आधी आरोपीच्या वहिनीला मारहाण केल्याचे दिसत आहे. कल्याणमधील एका रुग्णालयात आरोपी गोकुळ झा याची वहिनी आणि रिसेप्शनीस्ट यांच्यात बाचाबाची झाली. या बाचाबाचीदरम्यान रिसेप्शनीस्टने गोकुळ झाच्या वहिनीच्या कानाखाली मारले. यामुळे संतापलेल्या गोकुळ झाने रिसेप्शनीस्टला जबर मारहाण केली होती. "रिसेप्शनीस्टने मारहाण केली आणि म्हणूनच आपल्या मुलाने संतापाच्या भरात त्या मुलीला मारल्याचा आरोप झा कुटुंबाने केला आहे." असे झा कुटुंबाने म्हटले आहे. त्यामुळे आता रिसेप्शनीस्टवरही कारवाई करण्याची मागणी होत आहे. घटनेनंतर पसार झालेला आरोपी गोकुळ झा याने आपली ओळख लपवण्यासाठी लुक बदलला होता, पण पोलिसांनी त्याला अटक केली. गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजित झा यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या नव्या सीसीटीव्ही फुटेजमुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून, आता पोलिस या प्रकरणी काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Continues below advertisement