Kalyan: आरोग्य केंद्रातील शिपाई झाला डॉक्टर, चुकीच्या उपचारांमुळे रुग्णांचे मृत्यू ABP Majha
बोगस डॉक्टरने चुकीचे उपचार केल्याने मुरबाडच्या धसई परिसरात पाच जणांचा मृत्यू झालाय.. धक्कादायक बाब म्हणजे हा बोगस डॉक्टर धसई प्राथमिक आरोग्य केंद्रात काहीं वर्षांपूर्वी शिपाई म्हणून काम करत होता आणि निवृत्त झाला होता. या निवृत्त शिपायाने घरात दवाखाना टाकला होता.. एका आठवड्यात ३ जणांचा मृत्यू झाल्याचं आरोेग्य विभागाच्या निदर्शनास आलं.. याप्रकरणी बोगस डॉक्टर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात..