MLA Disqualification Case : संविधानाचं राज्य नसेल तर त्यांच्या बाजूने निकाल लागेल : कैलास पाटील

Continues below advertisement

MLA Disqualification Case : संविधानाचं राज्य नसेल तर त्यांच्या बाजूने निकाल लागेल : कैलास पाटील
संविधानाचा विचार करून जर निर्णय दिला तर तो आमच्या बाजूने लागेल आणि संविधानाचं राज्य नसेल तर त्यांच्या बाजूने निकाल लागेल. अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी  दिलीय .
 Shiv Sena MLA Disqualification Case :
 महाराष्ट्रासह संपूर्ण देशभराचे लक्ष लागून असलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेचा (Shiv Sena MLA Disqualification Case) निकाल आज सुनावण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar)  हे आज निकाल जाहीर करतील. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास निकाल येणे अपेक्षित आहे. जवळपास दीड वर्षांपूर्वी शिवसेनेत पडलेल्या अभूतपूर्व फुटीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. 

शिवसेना ठाकरे गटाकडून व्हीप आदेश मोडल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदारांवर अपात्रतेची याचिका दाखल केली. सुप्रीम कोर्टात जवळपास वर्षभराच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात काही गोष्टी स्पष्ट करत विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेचा सुनावणी घेऊन निकाल देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर, आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज निकाल सुनावणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram