Jyoti Mete Beed : बीडमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास ज्योती मेटे इच्छुक

Continues below advertisement

Jyoti Mete Beed : बीडमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास ज्योती मेटे इच्छुक  लोकसभा निवडणुकीच्या आधीच महायुती शरद पवारांना धक्का देण्यात आलाय..शरद पवार गटाकडून लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी रासपचे महादेव जानकर आणि दिवंगत विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटेंची नाव चर्चेत होती... मात्र महादेव जानकर यांनी मुंबईतील महायुतीच्या बैठकीला हजेरी लावली आणि ते महायुतीतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं.... महायुतीकडून महादेव जानकर परभणीची जागा लढण्याची शक्यता आहे....काहीच दिवसांपूर्वी शरद पवारांनी महादेव जानकर यांना महाविकास आघाडीतर्फे माढ्याची जागा लढण्याची ऑफर दिली होती... जानकरांनीही त्या ऑफरला सकारात्मक प्रतिसाद दिला होता.. पण आज जानकरांनी यू-टर्न घेत महायुतीतच राहण्याचा निर्णय घेतलाय..तर ज्योती मेटे यांनी सागर बंगल्यावर जाऊन फडणवीसांची भेट घेतली.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram