Special Report : ज्योतिविरोधात कारवाई, पाकिस्तान रडगाणं गाई, 'माझा' चा स्पेशल रिपोर्ट
Special Report : ज्योतिविरोधात कारवाई, पाकिस्तान रडगाणं गाई, 'माझा' चा स्पेशल रिपोर्ट
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या अटकेमुळे पाकिस्तानात खळबळ उडालीय...ज्योती मल्होत्राच्या अटकेला चक्क पाकिस्ताननं विरोध केलाय...
पाकिस्तानी पत्रकार आणि सोशल मीडिया एन्फ्लुएंसर हीरा बतूलनं ज्योतीच्या अटकेच्या विरोधात एक पोस्टही केलीय...यावरूनच ज्योतीचं पाकिस्तानशी किती घट्ट नातं होतं हे लक्षात येतंय...ज्योतीच्या कारनाम्यांचा हा स्पेशल रिपोर्ट..हेरगिरीच्या आरोपाखाली अटकेत असलेली यूट्यूबर ज्योती मल्होत्रा जिच्यासोबत सिस्टर कोड शेअर करतेय ती आहे पाकिस्तानी यूट्यूबर हीरा बतूल... भारतात ज्योती मल्होत्राला अटक झाली आणि तिकडे पाकिस्तानात हीरा बतूलला मिरची लागलीय... हीरा बतूलनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्वर ज्योतीच्या अटकेला विरोध केलाय. पाकिस्तानात ज्योतीची भेट हीरा बतूलसोबत झाली होती... दोघींमधलं बॉन्डिंग कॅमेऱ्यातही कैद झालंय...