Maratha Reservation Hearing : मराठा आरक्षणविषयीच्या क्युरेटिव्ह याचिकेवर आज निर्णय : ABP Majha
ख्रिसमसच्या सुट्ट्यांपूर्वी सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मराठा आरक्षणविषयीच्या क्युरेटिव्ह याचिकेवर आज निर्णय दिला जाण्याची दाट शक्यता आहे. तसंच ज्या न्यायपीठासमोर क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी झाली त्या न्यायपीठातील न्यायमूर्ती संजय किशन कौल हे २५ डिसेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. आज त्यांच्याही कामकाजाचा शेवटचा दिवस आहे. न्यायपीठातील न्यायाधीश निवृत्त होण्यापूर्वी निकाल देण्याची सर्वसाधारण परंपरा आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह पिटीशनवर आज निर्णयाची शक्यता आहे