Somnath Savle | ज्येष्ठ पत्रकार सोमनाथ सावळे यांचं निधन, दोन्ही मुलींकडून खांदा आणि मुखाग्नी
राजकीय विश्लेषक सोमनाथ सावळे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुखत निधन झाले आहे. ते 57 वर्षांचे होते, त्यांनी आपल्या 30 वर्षाच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत अनेक वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला , त्यामुळे त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील दर्पण पुरस्कारा सोबतच पत्र तपस्वी हा पुरस्कार राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात येऊन सन्मान करण्यात आला होता. मुला-मुलींमध्ये काही भेदभाव नाही हीच समानतेची शिकवण त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना दिली त्यामुळे आज त्यांच्या मृणाली व श्रुती या दोन्ही मुलींनी आपल्या वडिलांच्या प्रेताला खांदा देत मुखाग्नी दिला आहे. यामुळे परंपरेला फाटा देत एक समानतेचा संदेश समाजाला देण्यात आला आहे.