Jogeshwari Fire: ‘पालिका अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’, MNS ची पोलिसांत तक्रार special Report
Continues below advertisement
जोगेश्वरीतील (Jogeshwari) बेहरामबाग परिसरातील जेएमएस बिझनेस पार्क (JMS Business Park) इमारतीला लागलेल्या भीषण आगीमुळे मुंबई पुन्हा एकदा हादरली आहे. या प्रकरणी मनसेने (MNS) थेट पालिका (BMC) अधिकारी आणि विकासकांवर गंभीर आरोप केले आहेत. 'पालिका अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही ओशिवरा पोलीस स्टेशनला पत्र दिले आहे,' असे मनसेने म्हटले आहे. ओसी (OC) नसतानाही इमारतीत गोदामं आणि दुकानं सुरू होती, ज्यामुळे ही भीषण दुर्घटना घडली, असा आरोप मनसेने केला आहे. या आगीत अडकलेल्या २६ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले, तर १७ जणांना श्वास घेण्यास त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही मनसेने दिला आहे. या घटनेमुळे मुंबईतील ओसी नसलेल्या इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement