Mumbai Builder Death: जोगेश्वरी दुर्घटना: निष्काळजीपणामुळे तरुणीचा बळी, बिल्डरवर कारवाई कधी?

Continues below advertisement
जोगेश्वरी (Jogeshwari) येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून वीट कोसळून २२ वर्षीय संस्कृती अमीन (Sanskruti Amin) या तरुणीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी, 'निष्काळजीपणा करणाऱ्या बिल्डरला अटक करा', अशी संतप्त मागणी संस्कृतीच्या कुटुंबीयांनी आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे. संस्कृती काही दिवसांपूर्वीच बँकेत नोकरीला लागली होती आणि ती तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. कामावर जात असतानाच तिच्यावर काळाने घाला घातला. या घटनेनंतर महापालिकेने (BMC) संबंधित बिल्डरला नोटीस बजावून इमारतीचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, मनपाचा अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई करू, अशी भूमिका पोलिसांनी घेतल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola