Job Majha : ठाणे महानगरपालिकेत नोकरीची संधी; कोणत्या पदांसाठी जाग रिक्त? Abp Majha
Job Majha : ठाणे महानगरपालिकेत नोकरीची संधी; कोणत्या पदांसाठी जाग रिक्त? Abp Majha
ही बातमी पण वाचा
धमाकेदार आठवडा! तब्बल 5 तगडे आयपीओ येणार; पैसे कमवण्याची हीच नामी संधी
मुंबई : सध्या शेअर बाजारातील (Share Market) तेजी लक्षात घेता अनेक कंपन्या आपले आयपीओ बाजारात घेऊन येत आहेत. गेल्या आठवड्यात एकूण आठ कंपन्या आपले आयपीओ घेऊन आल्या होत्या. या आठवड्यात एकूण पाच कंपन्यांचे आयपीओ (IPO) येणार आहेत. त्यामुळे या आठवड्यातही आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना चांगले पैसे कमवण्याची उत्तम संधी आहे.
फक्त मेनबोर्ड आयपीओ
या आठवड्यात एकूण पाच नवे आयपीओ येत असले तरी यात फक्त एक आयपीओ हा मेनबोर्ड सेगमेंटचा आहे. या आयपीओचे नाव गाला प्रीसिजन इंजीनियरिंग लिमिटेड असे आहे. 2 सप्टेंबर रोजी हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. 4 सप्टेंबरपर्यंत या आयपीओत गुंतवणूक करता येईल. हा आयपीओ एकूण 168 कोटी रुपयांचा आहे. यात 135.34 कोटी रुपये हे फ्रेश इश्यू आणि 32.59 कोटी रुपये ऑफर फोर सेलमध्ये असतील. या आयपीओचा किंमत पट्टा 503 ते 529 रुपये प्रति शेअर आहे. या आयपीओत गुंतवणूक करायची अशेल तर तुम्हाला एका लॉटमध्ये कमीत कमी 28 शेअर खरेदी करावे लागतील. म्हणजेच तुमच्याकडे 14,812 रुपये असणे गरजेचे आहे.
एसएमई सेगमेंटमध्ये 4 नवे आयपीओ येणार
या आठवड्यात फक्त एक आयपीओ मेनबोर्ड सेगमेंटचा असेल. तर एसएमई सेगमेंटमध्ये एकूण चार कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. 2 सप्टेंबर रोजी जीयम ग्लोबल फूड्स हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. 4 सप्टेंबर पर्यंत या आयपीओत गुंतवणूक करता येईल. हा आयपीओ एकूण 81.94 कोटी रुपयांचा आहे. या आयपीओचा किंमत पट्टा 59 ते 61 रुपये प्रति शेअर आहे. एसएमई सेगमेंटचा दुसरा आयपीओ नेचरविंग्स हॉलीडेज असा आहे. 3 ते 5 सप्टेंबर या काळात या आयपीओत गुंतवणूक करता येईल. हा आयपीओ 7.03 कोटी रुपये आहे. या आयपीओचा किंमत पट्टा 74 रुपये आहे.