Jain Samaj Protest: या जागेत मंदिर आहे की नाही याची प्रशासनाकडून तपासणीी, स्थानिकांचा गोंधळ

Continues below advertisement
चंद्रपूरच्या जिवटी (Jivti) येथील जागेच्या बेकायदेशीर विक्रीवरून स्थानिक आक्रमक झाले असून शासकीय कर्मचारी आणि नागरिकांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. 'या देशामध्ये हे हास्यास्पद आहे, मोदीजींचं राज्य आहे आणि धर्माच्या राज्यामध्ये अख्खं मंदिर गायब केलंय', असा संतप्त सवाल आंदोलकांनी केला आहे. ही जागा एका पब्लिक ट्रस्टची (Public Trust) असून, ती 232 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप आहे, तर स्थानिकांच्या मते या जागेचे मूल्य 2000 कोटी रुपये आहे. या जागेवरील सुमारे 100 वर्षे जुनी विहीर आणि मंदिर रेकॉर्डवरून गायब करण्यात आल्याचा गंभीर आरोपही नागरिक करत आहेत. मंदिराचे अस्तित्व धोक्यात आल्याने एका नागरिकाने 'मंदिर तोडण्याचा प्रयत्न केल्यास आमरण उपोषण करेन', असा इशारा दिला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola