Jitendra Awhad: ओबीसींची जनगणना का होत नाही? - जितेंद्र आव्हाड ABP Majha
कुत्र्यांची, अन्य पशू-पक्ष्यांची जनगणना होते. मात्र, ओबीसी समाजाची स्वतंत्र गणना होत नाही. आरक्षण हा दारिद्र्य निर्मुलनाचा कार्यक्रम नाही. शोषितांना आरक्षण मिळाले, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितले आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ओबीसी समाजाचा मुख्यमंत्री होऊ शकतो, तर महाराष्ट्रात का नाही, अशी विचारणा जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे... राष्ट्रवादीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी मेळाव्यात जितेंद्र आव्हाड बोलत होते... यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी धनगरी वेशात ढोल वाजवत एन्ट्री केली...
Tags :
Jitendra Awhad Reservation OBC Meeting OBC Society Independent Census Poverty Alleviation Exploited Organized By NCP Dhangari Vesh