Jitendra Awhad : 50 कोटी खर्चून महायुतीचे उमेदवार लोकसभेत निवडून आले, जितेंद्र आव्हाडांचा आरोप
५० कोटी खर्चून महायुतीचे उमेदवार लोकसभेत निवडून आले असा थेट आरोप राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलाय. आव्हाडांच्या या आरोपांनंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली.. आरोप सिद्ध करा अन्यथा विधान रेकॉर्डवरुन काढा अशी मागणी भाजप आमदारांनी केलीये.
जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर हल्लाबोल
लोकसभा निवडणुकीत 45 जागा येणार असं म्हणणारे 17 जागांवर आले. त्यामुळे सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प मरता क्या नही करता? असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. सत्ताधाऱ्यांनी ज्या योजना घोषित केल्या आहेत, त्या सत्यात उतरणार आहेत का? असा प्रश्न आहे. शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, हे वास्तव आहे. तु्म्ही त्याला विरोधकांचे नेरेटिव्ह म्हणता. तुम्ही मुस्लिमांच्या मतांना व्होट जिहाद म्हणता. तर तुम्हाला मुस्लिम मत का देतील? भारती पवार, सुधीर मुनगंटीवार पराभूत झाल्या त्या मतदारसंघात किती मुस्लीम मतदार आहेत? असा सवालही आव्हाड यांनी केला.