Jitendra Awhad on Powai Case : मनपाच्या कारवाईवर आव्हाडांचा संताप, खाजगी बाऊन्सरला बाहेर काढलं

Continues below advertisement

पवईच्या भीम नगरमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना पालिका अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली. याचीच पाहणी आज शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांनी केली.. यावेळी त्यांनी खाजगी बाऊन्सर्सना बाहेर काढलं तर या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली.. तर पुढील कारवाई होऊ देणार नसल्याचंही आव्हाडांनी म्हटलंय. 

हे देखील वाचा

धक्कादायक! रेल्वे स्थानकावर नर्सची छेडछाड, अश्लील चाळे करत नराधमाचा लगड करण्याचा प्रयत्न; आसनगावमधील घटना

आसनगाव : नर्सची छेडछाड केल्याची घटना आसनगाव रेल्वे स्थानकावर घडली आहे. खाजगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या नर्सची आसनगाव रेल्वे स्थानकावर छेड काढण्यात आली. नर्सला पाहून रेल्वे स्टेशवरच नराधमाने अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नर्सशी नराधमाने लगड करण्याचा प्रयत्न केला. निलेश अरुण गायकवाड असं नराधमाचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी या नराधमाला बेड्या ठोकल्या.

आसनगाव रेल्वे स्थानकावर नर्सची छेडछाड

नर्स रेल्वे प्लॅटफॉर्मवर लोकल ट्रेनची वाट पाहत असताना नराधमाने अश्लील चाळे करत तिच्यासोबत लगड करण्याचा प्रयत्न केला. यावेळी घाबरलेल्या तरुणीने तत्काळ लोहमार्ग पोलिसांशी संपर्क केला. खाजगी रुग्णालयामध्ये नर्स पदावर कार्यरत असलेल्या 21 वर्षीय नर्ससोबत आसनगाव रेल्वे स्टेशनवर छेडछाड झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित नर्स आसनगावहून टिटवाळ्याला जात असताना हा धक्कादायक प्रकार घडला. टिटवाळ्यातील एका खाजगी रुग्णालयात नाईट शिफ्टसाठी जात असताना नराधमाने आसनगाव रेल्वे स्टेशवरच नर्ससोबत अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला. नराधमाने तिच्याशी लगड करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola