Jitendra Awhad On Akshay Sinde : अक्षय शिंदेलाच आपटेबाबत जास्त माहितीय, संस्थाचालक आपटे फरार आहे

Continues below advertisement

Jitendra Awhad On Akshyay Sinde : अक्षय शिंदेलाच आपटेबाबत जास्त माहितीय, संस्थाचालक आपटे फरार आहे
 - बलात्कार झाला तिथल्या प्रशासनाने म्हणजेच शाळेने पोलीस प्रशासनाला काही सांगितलं नाही सीसीटीव्ही गायब झाले  - ज्या शाळेने गुणा लपवला त्या शाळेच्या संचालकांवर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही गुन्हा लपवणे  हा देखील गुन्हा आहे  - पोलीस स्टेशनला कंप्लेंट उशिरा घेण्यात आली त्या पालकांना 13 13 तास बसवून ठेवण्यात आलं  - अक्षय शिंदे या प्रकरणातला सगळ्यात मोठा साक्षीदार ही होता आणि गुन्हेगार होता - फास्ट कोर्टातून त्याला फाशी मिळाली असती जनतेला आणि त्या मुलींनाही न्याय मिळाला असता  - अक्षय शिंदे ला अधिक ची माहिती तर माहिती नव्हती ना याच्यात कोणाला वाचवण्याचा तर प्रयत्न केला जात नाही ना?  - अक्षय शिंदे ला मारण्यासाठी जे काही डोकं लढवल्या ज्या काही युक्त्या केलेल्या आहेत त्या सगळ्या संशयास्पद आहेत  - अशा गुन्ह्यातल्या आरोपींना व्यवस्थित सुरक्षित ठेवायला हवं होतं कारण त्यांच्याकडे काय माहिती आहे हे कोणालाच माहीत नाही  - सध्याच्या परिस्थितीमध्ये पोलिसांवर कोणालाच विश्वास नाही  - ज्या पोलिसांवर गोळ्या झाडल्या असे दोन पोलीस अधिकारी हे चालत चालत हॉस्पिटलमध्ये गेले  - स्वसंरक्षणासाठी केला असेल तर काही हरकत नाही पण त्याच्या हातामध्ये रिवाल्वर लागलंच कसं  - एका आरोपीच्या मागे चार चार पोलीस असतात तो काय पैलवान आहे का  रिवाल्वर काढून घ्यायला - त्याला फाशी होणारच होती व्हायलाच हवी होती ते करण्यासाठी कायद्याचे काही रस्ते आहेत ना ते रस्ते बंद करून त्याचा असं काही फिल्मी शुटाऊट करता एन्काऊंटर करता तुम्ही स्वतःच्या सरकार बद्दलच संशय निर्माण करून घेतला सगळे धुके वरती जमा झाले सगळे ढग जमा झाले संशयाचे  - ही शाळा कोणाशी संबंधित आहे कुठल्या पक्षाशी संबंधित आहे कंप्लेंट घ्यायला का उशीर झाली  - कायद्याच्या मध्ये त्याला फास्टट्रॅक मध्ये फाशी दिली असती  - पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही दबाव आणला त्याची कंप्लेंट घेऊ नका त्याच्यात तुम्ही त्या इन्स्पेक्टरची बदली करून टाकली त्याची काही चुकी नाही  - मग गुन्हा घेतला पण संचालकांना बाहेर ठेवलं मग संचालकांना का बाहेर ठेवलं  - मग अधिक ची माहिती बाहेर येऊ नये हे जगाला कळूच नये मारून टाकलं  - गाडीमध्ये एन्काऊंटर होतो का?  - खोटं बोलायचं तर चांगलं तरी बोलायचं तो गाडीमधून पळत होता उडी मारून पळून गेला म्हणून गोळी मारली - हे सगळं संशयास्पद आहे  - एखादा आरोपी कितीही मोठा गुन्हेगार असो पाच पाच पोलीस बसलेले असतात त्याचे काय हिम्मत होईल कोणाच्या कमरेला हात घालायची?  - कोणालाच गोळी लागली नाही , हे सगळे सांगतात ते सगळं खोटं आहे याचं कारण असं सगळे पोलीस अधिकारी ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये चालत गेले आहेत समोर स्ट्रेचर होते त्यावर जाऊन झोपले  - सगळ प्रकरण संशयस्पद  आहे  - तुम्ही सीसीटीव्ही कोणाच्या परवानगीने बाहेर काढून टाकला ? - सरकारने अशी कृती करू नये  - आपटे फरार आहेत यांच्यातच सगळे गुपित लपल आहे - अक्षय शिंदेलाच आपटेंबद्दल जास्तं माहिती आहे  - आपटे होते म्हणून इथपर्यंत वाचलेत कांबळे असते तर मारून झोडून पोहचवून टाकल असत. - ते आपटे आहेत ते पण कुठल्या संघटनेचे बाप रे बाप  - आमची इच्छा आहे फाशी व्हावी पण फाशीचा एक मार्ग आहे फास्ट कोर्टा अनौन्स केलं असत नव्वद. दिवसात निकाल दिला असतात तर सगळच झालं असत  - हा उत्तर प्रदेश आणि बिहार सारखा न्याय कुठून आणता तुम्ही - महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे तुम्ही हे असल करून कायद्याचे बारा वाजवता - निष्कारण पोलीस बदनाम होतात - आपटे जोपर्यंत ताब्यात येत नही तोपर्यंत अक्षय शिंदे हा तुमचं महत्वाचा साक्षीदार आहे - बेड्या घातलेला माणूस बंदूक कशी खेचू शकतात  - त्याच्या डोक्यात गोळी घातली आहे  - कायदा सुव्यवस्था नाही हे सगळ पॉलिटिकल रॉबिन हुड ज्याला म्हणतात ना तो प्रकार आहे  - आपटेना वाचवण्यासाठी तुम्ही मारलं नाही ना? असे लोक विचारतील ना - अक्षय शिंदे ल मारून ही कायमची केस बंद करण्याचे काम केले आहे -  नवीन तंत्रज्ञानात फरार आरोपी भेटत नहित हे संगणच हास्यास्पद आहे - आपल्या भोवती संशयाचं जाळ हे सरकारने निर्माण केले आहे - लोकांचा संशय आता दाट होईल यात कोणीतरी मोठ अडकल आहे म्हणून हे केलं आहे  - आम्हाला त्याला फाशी होऊ नये अशी बिलकुल इच्छा न्हवती त्या मुली मझ्या नाती सारख्या मझ्या मुली सारख्या आहेत त्याला फाशीची व्हायला हवी होती पण त्याला कही मार्ग आहे ना ९० दिवसांच्या कोर्टात त्याला फाशी झाली असती

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram