OBC वर आपला विश्वास नाही, कारण मंडल आयोग आला तेव्हा आरक्षणासाठी लढायला ओबीसी तयार नव्हते :Jitendra Awhad
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या एका वक्तव्यावरून वादाला तोंड फुटलंय. ओबीसींवर आपला विश्वास नाही, कारण मंडल आयोग आला तेव्हा आरक्षणासाठी लढायला ओबीसी तयार नव्हते, असं वक्तव्य आव्हाड यांनी केलं. ओबीसींवर ब्राह्मण्यवादाचा पगडा असल्यानं ते अशी भूमिका घेतात अशी टीका आव्हाड यांनी केली होती. आता राजकीय आरक्षणाच्या निमित्तानं का होईना ते पुढे येत आहेत, असं आव्हाड म्हणाले