Jitendra Awhad : राज ठाकरेंच्या कार्यकर्त्याची हत्या,दादांच्या नेत्यावर आरोप,आव्हाडांचा गौप्यस्फोट!

Continues below advertisement

Jitendra Awhad : राज ठाकरेंच्या कार्यकर्त्याची हत्या,दादांच्या नेत्यावर आरोप,आव्हाडांचा गौप्यस्फोट!

जमील शेख नावाच्या मनसे कार्यकर्त्याची हत्या नजीक मुल्ला या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्याने केली.  ही कबुली ज्याने जमील वर गोळी झाडली त्या आरोपीने दिली आहे.  त्यावेळी जी एफआयर नोंद करण्यात आली आहे.  त्यामधे नजीब मुल्लाच नाव आहे मग ज्यावेळी कोर्टात चार्जशीट दाखल झाली त्यावेळी मात्र त्याच नाव काढण्यात आलं हे कुणाच्या सांगण्यावरून घडलं?  २०१४ साली जमीलला नजीब मुल्लाच्या सांगण्यावरून मारहाण झाली होती.  अशी माहिती खुद्द जमीलने कोर्टात दिली होती.  त्यावेळी देखील एफआयर करण्यात आली मात्र कारवाई काहीच झाली नाही. मंत्रालयातील एका नेत्याने फोन केला आणि कारवाई मागे घेण्यात अली.  हा नेता तेव्हा पासून नजीब मुलाच्या मागे आहे.  जमील शेखची आई माझ्याकडे सातत्याने या विषया संदर्भात येत होती मात्र त्यावेळी मी शांत राहिलो कारण त्यावेळी माझ्यावर आरोप झाला असता की मी निवडणुकीत राजकारण करतोय.  मी आज १ लाख मतांनी निवडून आल्यानंतर बोलत आहोत  ठाकरे नावाचा अधिकारी आहे ज्याने जमील शेखवर गोळी झाडणाऱ्या आरोपीला उत्तर प्रदेश मधे अटक केली.  त्यावेळी आरोपीनी सांगितलं की नजीब मुल्ला याने सुपारी दिली होती. ठाकरे यांनी एफआयर घेतल्यानंतर मंत्रालयातील नजीबच्या आकाने फोनाफोनी केली आणि ठाकरे नावाच्या चांगल्या अधिकाऱ्याची ८ तासात बदली झाली.  संबंधित अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर दहशत निर्माण करण्यासाठी नजीब मुल्लाने बदलीची ऑर्डर स्टेट्सला ठेवली होती  या प्रकरणी कारवाई व्हावी यासाठी मी न्यायालयीन लढाई लढणार आहे

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram