Jitendra Awhad Full PC : हिंदी, इंग्रजी येत नाही... मिमिक्री करत Ajit Pawar यांच्यावर थेट हल्ला
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJitendra Awhad on Ajit Pawar : ज्यांनी खाऊ घातलं त्यांचा झाला नाही, तो महाराष्ट्राचा काय होणार? अशी घणाघाती टीका शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर केली आहे. माझं कुटुंब सोडून पवार घराण्यातील सर्वजण माझ्याविरोधात प्रचार करतील, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांवर हल्लाबोल केलाय.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, भाषणाची वेळ आली की, अजित पवार बाथरुममध्ये असायचे. तुम्हाला हिंदी-इंग्रजी बोलता येत नाही, या तुमच्या कमतरता होत्या. कधी समोर येऊन सांगितल्या नाहीत. तू शरद पवारांच्या भावाचा मुलगा होता, म्हणूनच उपमुख्यमंत्री झाला. अरे काय काका का? का म्हणजे कारखानदार, का म्हणजे कापूस, असं मी अमोल कोल्हेंना काल सांगितले होते. अजित पवार महाराष्ट्रात तुम्ही काय केलं सांगा. कोणता क्रांतीकारक निर्णय घेतला सांगा. सामान्य माणसाला तुमच्यासमोर येण्याचे धैर्य नाही. सुप्रिया सुळेंकडे प्रत्येकजण येऊन सेल्फी काढतो. तुम्हाला लोक घाबरतात.