Jitendra Awhad statement on Ram full PC:भावना दुखावल्यास खेद, आव्हाड श्री राम बाबत काय म्हणाले?

Continues below advertisement

Jitendra Awhad Press Conferance at Shirdi: शिर्डी : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)  यांनी प्रभू श्रीराम (Shri Ram) मांसाहारी असल्याचं वक्तव्य केलं. आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले. अशातच आज (गुरुवारी) जितेंद्र आव्हाडांनी पत्रकार परिषद घेत आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. इतिहासाचं विकृतीकरण करणं माझं काम नाही. पण मी काल जे बोललो ते ओघात बोलून गेलो, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.  जितेंद्र आव्हाड बोलताना म्हणाले की, "मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. इतिहासाचं विकृतीकरण करणं माझं काम नाही. पण मी काल जे बोललो ते ओघात बोलून गेलो. राम, प्रभू श्रीराम, ज्याला आम्ही महाराष्ट्रात पांडुरंग हरी म्हणतो. त्या रामाबद्दल बोलताना मी म्हणालो की, ते मांसाहारी होते. हा वाद मला वाढवायचा नाही."

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram