Jitendra Awhad Speech: वाल्मिक रक्तपिपासू, नरभक्षक ;आकाचा बाप त्याला पहिलं मंत्रिमंडळातून हकला!

Continues below advertisement

Jitendra Awhad Speech: वाल्मिक रक्तपिपासू, नरभक्षक ;आकाचा बाप त्याला पहिलं मंत्रिमंडळातून हकला!

बीडमध्ये वंजारी समाजाच्या अनेकांची हत्या झाली आहे. मी देखील जातीनं वंजारी आहे. पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलं आहे. पुसलं गेलेलं कुंकू कोणी परत आणू देणार आहे का? तरीदेखील आपण राजकारण करतो. या ताईच्या भविष्याचा कोणाला विचार आहे का? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार हल्लाबोल केला. मी शांत बसणार नाही, याविरोधात लढणार असल्याचे आव्हाड म्हणाले. तुम्ही वाल्मिक का म्हणता? हा वाल्मिक नाही वाल्या आहे. वाल्याचा वाल्मिकी झाला होता पण इथं वाल्मिकीचा वाल्या झाला असल्याचे आनव्हाड म्हणाले. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या विरोधात बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला, त्यावेळी जितेंद्र आव्हाड बोलत होते. 

वेळेत कारवाई झाली नाहीतर महाराष्ट्रात आग लागल्याशिवाय राहणार नसल्याचे आव्हाड म्हणाले. हा शिवराज बांगर, याच्यावर किती गुन्हे वाल्याने दाखल केले विचारा. हा घरात कमी आणि कोर्टात जास्त असतो. बीडच्या परिस्थितीला पालकमंत्री आणि पोलीस जबाबदार आहेत असे म्हणत नाव न घेता आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. इथला प्रत्येक अधिकारी धनंजय मुंडेलाच विचारुन करणार असाल तर कशी हिंमत होईल त्यांची. तुम्हाला सगळं माहिती आहे असेही आव्हाड म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram