Jitendra Awhad Full PC : सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे लोक काहीही करू शकतात

Continues below advertisement

Jitendra Awhad Full PC : सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे लोक काहीही करू शकतात 

राजदीप सरदेसाई यांच्या ‘२०२४ : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकातील छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या  मुलाखतीवरुन प्रचंड खळबळ उडाली आहे. या मुलाखतीमध्ये छगन भुजबळ यांनी आपण केवळ ईडीच्या (ED) कारवाईपासून वाचण्यासाठी भाजपसोबत (BJP) गेल्याचं सांगण्यात आलं आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या पुस्तकात भुजबळ Ed च्या कारवाईबाबत स्पष्ट बोलले आहेत. सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे लोक काहीही करू शकतात असेही आव्हाड म्हणाले. भुजबळ सत्य बोलणारे आक्रमक नेते आहेत. Ed चा धमकवण्यासाठी वापर केला जातोय, असे आव्हाड म्हणाले. भुजबळांनी पुस्तकावर कारवाई करावी, ते राजदीप सरदेसाई आहेत, सर्व पुरावे त्यांच्याकडे असल्याचे भुजबळ म्हणाले.    महराष्ट्रात सर्व लोकांना माहिती आहे की, भाजप कसे घाबरवत आहे. सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे लोक काहीही करू शकतात असेही आव्हाड म्हणाले. राम मंदिरामध्ये पाणी गळत आहे, त्याबाबत मोदी कधी बोलले का? इतर बाबतीत मोदी कधी बोलले का? असा सवालही त्यांनी केला. भुजबळ यांचे त्रिवार सत्य आहे ते कशासाठी गेले तिकडे असेही आव्हाड म्हणाले. आर आर पाटील हे सत्यवादी माणूस होते. गेलेल्या माणसावर बोलणं ही आपली संस्कृती नाही. आर आर पाटील यांनी तुम्हाला किती मदत केली असेही आव्हाड म्हणाले.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram