Jitendra Awhad : फडणवीसांच्या आरोपांमागचा हेतू काय? त्यांचे आरोप हास्यास्पद : जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad : फडणवीसांच्या आरोपांमागचा हेतू काय? त्यांचे आरोप हास्यास्पद : जितेंद्र आव्हाड  

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेला अहवाल आव्हाड यांनी लिहिलेला आहे. असा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री कुशाग्र बुद्धीचे देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांचा यामागील हेतू मला कळत नाही. हा हास्यास्पद आरोप आहे. याबद्दल माझ्या मनात शंका नाही. सिताराम कुंटे यांच्या प्रशासकीय सेवेतील अनुभवाचा आणि त्यांच्या प्रामाणिक पणाचा या वाक्यातून अपमान झाला आहे. एकंदर पोलीस खात्यातील अधिकारी व प्रशासकीय सेवेतील अधिकारी यांचं मनोबल खच्चीकरण करण्याच कामच जणू विरोधी पक्षाकडून सुरु आहे. पण याकडे मी सकारात्मक दृष्टीकोनातून पाहतो. जितेंद्र आव्हाड अहवाल लिहू शकतात. एवढं देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले तेच खूप झालं, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola