Jejuri Trustee Controversy : विश्वस्तपदी नियुक्ती केल्याप्रकरणी जेजुरी ग्रामस्थांनी पुनर्विचार याचिका
Continues below advertisement
अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या मार्तंड देवस्थानच्या विश्वस्तपदी बाहेरील व्यक्तीची नियुक्ती केल्याप्रकरणी जेजुरी ग्रामस्थांचं आंदोलन मागच्या १० दिवसांपासून सुरु आहे. देवस्थानच्या विश्वस्तपदी नियुक्ती केल्याप्रकरणी जेजुरी ग्रामस्थांनी पुनर्विचार याचिका धर्मादायुक्तांकडे दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी होणार आहे. तसंच नवनियुक्त विश्वस्त मंडळाने जेजुरी पोलीस ठाणे येथील मार्तंड सभागृहात बैठक घेतली. या बैठकीत पोपट खोमणे यांची प्रमुख विश्वस्तपदी नेमणूक केली. त्यामुळं हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. नवनियुक्त विश्वस्तांनी येऊन प्रमुख विश्वस्तांची नेमणूक केल्याने जेजुरीकर आक्रमक होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement