Jejuri Somvati Amavasya 2023 : जेजुरीत सोमवती यात्रा, भाविकांची गर्दी : ABP Majha

Khandoba Somvati Amavasya Yatra: महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबाची (Khandoba Mandir) जेजुरी (Jejuri) भंडाऱ्यानं न्हाऊन निघाली आहे. आज जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती यात्रा (Somvati Amavasya Yatra) असून, यळकोट यळकोटचा गजर करत भंडाऱ्याची उधळण करत लाखो भाविक खंडेरायाच्या जेजुरीत (Jejuri Khandoba Yatra) दाखल झाले आहेत. तर भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनही सज्ज झालं आहे. कऱ्हा नदीवर देवाचा पालखी सोहळा स्नानासाठी आल्यानंतर भाविकांसाठी पार्किंग सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच महाप्रसादाचे नियोजन देखील करण्यात आलं आहे. राज्यभरातून लाखो भाविकांनी जेजुरीगडावर खंडेरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola