Jaykumar Gore Speech : सहकार कारखाना ते सोलापूर-गोवाफ्लाईट, जयकुमार गोरेंनी सगळं काढलं

सोलापूर: सहकार वाढला पाहिजे, सहकारने अनेक पिढ्या घडवल्या आहेत. शेतकरी संपन्न केलाय, हे सगळं खरं असलं तरी सहकारमध्ये सुरु असलेले  बेबंदशाही थांबवण्याची जबाबदारी सहकारमंत्री म्हणून बाबासाहेब पाटील तुमची आहे. डीसीसी बँक, राज्य बँकेचे उदाहरणं तुम्ही पाहा. एक प्रशासक बसला होता तर डीसीसी बँक व्यवस्थित चालयाला लागली, याचं आत्मपरीक्षन केलं पाहिजे. राज्य बँक जी हजारो कोटी तोट्यात होती, पण प्रशासक आला आणि ही राज्य बँक हजारो कोटीच्या नफ्यात आहे. याचं कधी तरी आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे.

सहकरामध्ये आपण पाहतो अनेकांचे कारखाने उभे राहिले, लोकांचे बँकाचे पैसे लागले. अनेक कारखाने सुंदर चालतात, पण कारखानदारी हे कुटुंब चालवण्याचे साधन म्हणून अलीकडे काहींनी बघितलं, त्यामुळे सहकार बदनाम झालाय, अशी बोचरी टीका ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी केली आहे. मंत्री जयकुमार गोरे यांच्या टीकेचा रोख पवार कुटुंबावर असून त्यांनी कुणाचे नाव न घेता ही टीका केल्याचे बोललं जात आहे.  

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola