Nitin Gadkari : बेळगाव जेलमधून दुसरीकडे नेण्यात यावं म्हणून गडकरींना धमकीचा फोन, जयेश पुजारीचा दावा
Continues below advertisement
नितीन गडकरींना धमकी देणारा कुख्यात गँगस्टर जयेश पुजारीनं बेळगाव आणि नागपूर पोलिसांच्या चौकशीत काही धक्कादायक खुलासे केले आहेत.. जयेश पुजारीला काहीही करून बेळगावच्या तुरुंगातून बाहेर निघायचे होते.. त्यासाठीच तुरुंगातूनच असे काही कृत्य करायचे की दुसऱ्या ठिकाणी गुन्हा नोंद होऊन तिथे नेण्यासाठी पोलीस इथून बाहेर काढतील, आणि तसं झालं की संधी मिळताच पळून जायचं अशी त्याची योजना होती. मात्र सध्या तरी पोलीस त्याच्या स्पष्टीकरणावर समाधानी नाहीयेत, आणि संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास केला जाणार आहे.
Continues below advertisement