Jaydeep Apte Arrested : जयदीप आपटेला अटक, आपटेला घेऊन सिंधुदुर्ग पोलीस मालवणला रवाना

Continues below advertisement

जयदीप आपटे पोलिसांना नेमका कसा सापडला?

जयदीप आपटे हा कसाऱ्यावरून लोकल ट्रेनने कल्याण रेल्वे स्थानकात आला. कल्याणला उतरल्यावर जयदीप रिक्षा करून दूध नाका परिसरात उतरला. यावेळी जयदीपने डोक्यावर टोपी घातली होती आणि तोंडाला मास्क लावला होता. त्याच्या हातात दोन बॅग होत्या.  टोपी आणि मास्क लावून जयदीप आपटे हा आपल्या राहत्या घरी कुटुंबाला भेटण्यासाठी जात होता. मात्र, इमारतीच्या गेटवर  पोलीस बंदोबस्त  तैनात करण्यात आला होता. इमारतीमध्ये जाणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे ओळखपत्र पाहिल्याशिवाय पोलीस कोणत्याही रहिवाशांना इमारतीमध्ये सोडत नव्हते.

जयदीप आपटे हा इमारतीपाशी आल्यावर पोलिसांनी त्याच्याकड आयडी कार्ड मागितले. त्यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांना त्याचा चेहरा पाहून हा जयदीप आपटेच असावा, असा संशय आला. त्यामुळे  पोलिसांनी त्याला त्याच्या नावाने आवाज दिला आणि घाबरलेल्या भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या जयदीप आपटे रडायला लागला. पोलिसांनी त्याची समजूत काढत इमारती खालून ताब्यात घेतले.

घरात जाण्यासाठी जयदीप पोलिसांना आग्रह करत होता. मात्र,  परिसरात बघ्यांची गर्दी जमली होती. त्यामुळे इमारतीच्या खाली जयदीप आपटे याची आई आणि पत्नी पोलिसांच्या गाडीपर्यंत आले. पोलिसांनी जयदीप आपटेला घरात न जाताच इमारतीच्या खालूनच डीसीबी स्कॉडकडे नेले.  सिंधुदुर्ग पोलीस जयदीप आपटेच्या मागावर होते. काहीवेळातच डीसीपी कार्यालयमध्ये सिंधुदुर्ग पोलीस पोहोचले. त्यानंतर डीसीपी कार्यालयामध्ये जयदीप आपटेची कसून  चौकशी करण्यात आली. ही चौकशी संपल्यानंतर जयदीप आपटेला रितसर सिंधुदुर्ग पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram