Jayashree Thorat : आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी 50 जणांवर गुन्हे दाखल
Jayashree Thorat : आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी 50 जणांवर गुन्हे दाखल
हेही वाचा :
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) घोषणा झाल्यानंतर कोपरगाव विधानसभा मतदारसंघ (Kopargaon Vidhan Sabha Constituency) चांगलाच चर्चेत आला आहे. कारण या मतदारसंघाची जागा महायुतीत अजित पवार गटाला सुटली होती. मात्र भाजप नेते विवेक कोल्हे (Vivek Kolhe) निवडणुकीसाठी इच्छुक असल्याने महायुतीत जोरदार रस्सीखेच पहायला मिळाली. अखेर कोल्हे कुटुंबीयांनी निवडणूक माघार घेतल्याने अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांचा मार्ग मोकळा झाला. आता आशुतोष काळे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाने (NCP Sharad Pawar Group) निष्ठावान कार्यकर्त्याला संधी दिली आहे. मागील निवडणुकीत काळेंचा प्रचार करणारा कार्यकर्ता आता त्यांच्या विरोधात निवडणूक लढत आहे.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक होत असून कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून कोल्हे परिवाराने माघार घेतल्यानंतर शरद पवारांनी विद्यमान आमदार आशुतोष काळे विरोधात सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिलीय. संदीप वर्पे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वर्पे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शरद पवारांना अहिल्यानगर जिल्ह्यात अजून एक निलेश लंके सापडला, अशी चर्चा आता कोपरगाव मतदारसंघात रंगताना दिसत आहे.