WEB EXCLUSIVE| जयंत पाटलांचे चिरंजीव प्रतिक पाटील यांच्या नेतृत्वात 'जयंत युवा किसान ट्रॅकटर मोर्चा'
केंद्र सरकारच्या कृषी कायद्या विरोधात आणि पेट्रोल,डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून युवा किसान ट्रॅकटर मोर्चा काढण्यात आला. आष्टा ते इस्लामपूर मार्गावरून इस्लामपूर तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला.जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या ट्रॅकटर मोर्चात शेकडो ट्रॅकटरसह शेतकरी सहभागी झाले होते.