आमची कमिटमेंट 5 वर्षांसाठी आहे, त्यामुळे धोका नाही, मोदी-ठाकरे भेटीवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया
CM Thackeray Meets PM Modi : शिष्टमंडळासोबतच्या अधिकृत भेटी दरम्यानच मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात वैयक्तिक भेट होणार असल्याची चर्चा रंगली होती. त्याविषयी सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधानांसोबत वैयक्तिक भेट झाली. सत्तेत एकत्र नसलो तरी याचा अर्थ नातं तुटलं असा होत नाही. पंतप्रधानांना भेटणं यात गैर काय? मी नवाज शरीफ यांना भेटायला गेलो नव्हतो, आपल्याच पतंप्रधानांची भेट घेतली., असं मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यात जवळपास तीस मिनिटं भेट झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
Tags :
Congress PM Modi Narendra Modi Uddhav Thackeray Jayant Patil Cm Thackeray State Minister State Chief Minister