NCP State President | Jayant Patil भावूक, Shashikant Shinde नवे प्रदेशाध्यक्ष
जयंत पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वसाधारण बैठकीत शशिकांत शिंदे यांच्या नावाची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली. शरद पवार यांच्या उपस्थितीत ही घोषणा झाली. राजीनाम्यानंतर जयंत पाटील त्यांच्या भाषणादरम्यान भावूक झाले. "सात वर्षात एकही दिवस सुट्टी घेतली नसल्याचं" त्यांनी यावेळी सांगितले. जयंत पाटील यांनी सात वर्षांपासून प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती. आता शशिकांत शिंदे यांच्यावर पक्षाची नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हा एक महत्त्वाचा बदल मानला जात आहे. पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात या बदलाचे महत्त्व मोठे आहे.