पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या पॅकेजमधील फूल ना फुलाची पाकळी मिळेल याची प्रतीक्षा : जयंत पाटील
Continues below advertisement
सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. त्यातलं अजून तरी काहीच मिळालं नाही. शेवटी देशाच्या पंतप्रधान यांनी जाहीर केलेलं ते पॅकेज आहे. त्यामुळे आम्हाला नरेंद्र मोदींकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. आजही केंद्र सरकारकडून आम्हाला फूल ना फुलाची पाकळी येईल असं वाटत होतं. पण अजून काही आलेलं नाही, ही मदत कधी मिळेल याच्या प्रतीक्षेत आहोत, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला. सांगलीतील विटा नगरपालिकेला जयंत पाटील यांनी भेट दिली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील बोलत होते.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement