Jayant Patil Full PC : दादा - साहेबांचं मनोमिलन होणार? जयंतरावांनी दिली बैठकीतील माहिती
मुंबई : पावसाळी अधिवेशनाआधी अजित पवार गटाच्या मंत्र्याची बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार यांना भेटण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिती तटकरे, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, छगन भुजबळ वाय बी चव्हाण सेंटरला पोहचले आहेत. देवगिरीवर झालेल्या बैठकीला सुनील तटकरे यांनी मार्गदर्शन केले. बैठकीनंतर अजित पवारांसह सर्व मंत्री वाय बी सेंटरला पोहचले. बैठकीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. या बैठकीसाठी जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड देखील पोहचले आहेत.
Tags :
Supriya Sule Jayant Patil Praful Patel Hasan Mushrif NCP Sharad Pawar Maharashtra NCP Crisis Ajit Pawar