Jayant Patil Baramati:विरोधी पक्षाच्या लोकांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे का?

Continues below advertisement

Jayant Patil Baramati:विरोधी पक्षाच्या लोकांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे का?  सत्तेत बसलेल्या लोकांना माहीत आहे की आपण सत्तेतून जाणार आहे. आता लोकांनी चंद्रदेखील मागितला तर ते देतील असा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. पवारसाहेबांना कुणी डिवचू नये, त्यांच्या एकदा डोक्यात बसलं की काय खरं नाही असं म्हणत जयंत पाटील यांनी राज्यातल्या महायुती सरकारला इशारा दिला. आरक्षणावर नुसता बोलायचं आणि निघून जायचं असं म्हणणाऱ्यांनी त्यांची नीतिमत्ता खुंटीला टांगून ठेवली आहे अशी टीकाही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर केली. जयंत पाटील बारामतीमध्ये पक्षाच्या कार्यक्रमात बोलत होते.   महायुती सरकारवर टीका करताना जयंत पाटील म्हणाले की, हे महाराष्ट्र विरोधी सरकार सरकार आहे. राज्यात महाविकास आघाडी 170 ते 175 जगावर निवडून येईल. आम्ही सांगत होतो साहेबांना, लोकसभेला 14 जागा घेऊया. पण साहेबांनी 10 जागा घेतल्या. पवार साहेबांच्या डोक्यात एकदा बसलं की काय खरं नाही. त्यांनी एकदा मनावर घेतलं तर पाठ लावून सोडतात. म्हणून त्यांना कुणी डिवचू नये.  आता चंद्र जरी मागितला तर देतील जयंत पाटील म्हणाले की, सत्तेत बसलेल्या लोकांना माहीत आहे की आपण सत्तेतून जाणार आहे. आता लोकांनी चंद्रदेखील मागितला तर ते देतील. प्रत्येक मतदारसंघात बंडखोरी कशी होईल यासाठी विरोधकांकडून प्रयत्न केले जातील. भाजपमध्ये राम राहिला नाही, भाजपला राम सोडून गेला आहे. जिथं रामाचे देवळ आहे तिथं यांचा पराभव झाला आहे. युगेंद्र पवार इथे रस घ्यायला लागले आहेत याचा आनंद आहे. युगेंद्र पवारांना आपण साथ देत आहात. नव्या रक्तात तुम्ही नेतृत्व देऊ पाहात आहात. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram