Kolhapur : जवान प्रशांत जाधव अनंतात विलीन, बसर्गे गावात शासकीय इतामामात अंत्यसंस्कार
Kolhapur : लडाखमध्ये भारतीय लष्कराचं वाहन नदीत कोसळल्याची घटना घडलीय... या घटनेत सात जवानांचा मृत्यू झाला आहे.. तर एकूण २६ जण या वाहनामध्ये होते.. या घटनेत कोल्हापूरच्या गडहिंग्लजमधील बसर्गे बुद्रुक येथील प्रशांत शिवाजी जाधव आणि साताऱ्यातील विसापूर येथील विजय शिंदे या जवानांना वीरगती प्राप्त झालीय.. अपघातानंतर लगेचच जवानांची सुटका करण्यात आली आहे.. थॉईसपासून सुमारे २५ किलोमिटर अंतरावर हा अपघात झाला आहे.. दरम्यान बसला अपघात कशामुळे झाला.. यामागचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.. लष्करानं अद्याप तरी अपघाताबद्दलची अधिकृत माहिती दिलेली नाही..
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv