Sangli Politics:जयंत पाटलांच्या साखर कारखान्याचं नाव रात्रीत बदललं, नवा वाद पेटला.
Continues below advertisement
सांगलीतील जतमध्ये साखर कारखान्याच्या नावावरून राजकीय वाद पेटला असून आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) आमनेसामने आले आहेत. 'जतच्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याचा यंदा धुराडा पेटू देणार नाही', असा थेट इशारा काही दिवसांपूर्वीच आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला होता. त्यानंतर आता अज्ञात व्यक्तींनी जयंत पाटील यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या 'राजारामबापू पाटील साखर कारखान्याचा' फलक बदलून त्यावर 'राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना' असा नवीन फलक लावला आहे. पडळकर यांनी या नाव बदलाचे समर्थन केले असून, हा कारखाना सभासदांच्या मालकीचा झाला पाहिजे अशी भूमिका घेतली आहे. तर, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या घटनेचा निषेध केला आहे. राजे विजयसिंह डफळे हे जत संस्थानचे शेवटचे राजे होते आणि त्यांच्या नावाने अनेक संस्था कार्यरत आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement