Jarange Slams Ajit Pawar | 'कोणता मराठा सुखी ठेवला?, जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली आहे. अजित पवारांवर बोलताना जरांगेंनी भुजबळांचा 'अलिबाबा' असा उल्लेख केला. जरांगे यांनी अजित पवार यांना "कोणता मराठा तुम्ही तुम्ही सुखी ठेवला?" असा सवाल केला. सरकार म्हणून कुणालाही नाराज करायचं नाही, अशी भूमिका अजित पवारांनी मांडली होती. यावर जरांगे यांनी "अन्याय होईल तर का राहील? असून दिलं नाही तेव्हा अन्याय कळतं. तुम्ही कार्यकर्ते असे पाडलेत तेव्हा अन्याय कळतं," असे प्रत्युत्तर दिले. जरांगे यांनी 'अलिबाबा चाळीस चोर, अलिबाबा पाडलात' असे म्हणत टीका केली. त्यांनी 'परळीची लाभार्थी गँग' यावरही भाष्य केले. या गँगने सगळे वाजरे आणि ओबीसी बदनाम केल्याचा आरोप जरांगे यांनी केला. या गँगचे दोन नेते अजित पवारांच्या माध्यमातून बोलत असल्याचा दावाही जरांगे यांनी केला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola