Manoj Jarange Patil : कर्जमाफीवरून बच्चू कडूंवर संतापले जरांगे पाटील

Continues below advertisement
शेतकरी कर्जमाफीच्या (Farm Loan Waiver) मुद्द्यावरून आता मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. 'तुमच्या आश्वासनावर शेतकरी जगू शकत नाही, ही प्युअर फसवणूक आहे', अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली आहे. सरकारने ३० जून २०२६ पर्यंत कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं आहे, ज्याला बच्चू कडू यांनी पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, एवढा वेळ थांबल्यास शेतकरी जगणार नाही, ही मदत म्हणजे एखाद्या रुग्णाला तातडीच्या वेळी इंजेक्शन न देता सहा महिन्यांनी देण्यासारखं आहे, असं म्हणत जरांगे यांनी या विलंबाला विरोध केला आहे. तर दुसरीकडे, उशिरा होणाऱ्या कर्जमाफीत जास्त शेतकऱ्यांचा समावेश होईल, असा दावा बच्चू कडू करत आहेत. या मतभेदांमुळे कर्जमाफीच्या आंदोलनात फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola