Janhvi Kapoor Interview Exclusive : क्रिकेटप्रेमी जोडप्याची गोष्ट; कसा आहे Mr. And Mrs. Mahi : ABP

Janhvi Kapoor Interview Exclusive : क्रिकेटप्रेमी जोडप्याची गोष्ट; कसा आहे  Mr. And Mrs. Mahi : ABP

Mr & Mrs Mahi: राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) यांचा  'मिस्टर अँड मिसेस माही' (Mr & Mrs Mahi) काही दिवसांतच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता देखील आहे. हा चित्रपट 31 मे 2024 रोजी सिनेमागृहात दाखल होणार आहे. पण त्याआधी चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. खरंतर 31 मे हा सिनेमा लव्हर्स डे म्हणून साजरा केला जातो. त्यादिवशी तुम्ही अगदी स्वस्त दरात मिस्टर अँड मिसेस माही हा सिनेमा पाहू शकता. 

सिनेमा लव्हर्स डे दिवशी राजकुमार राव आणि जान्हवी कपूरचे चाहते त्यांचा 'मिस्टर अँड मिसेस माही' हा चित्रपट फक्त 99 रुपयांमध्ये पाहू शकतील. ही माहिती चित्रपटाच्या प्रोडक्शन हाऊस धर्मा प्रोडक्शनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. 'मिस्टर अँड मिसेस माही'चा एक मिक्सअप व्हिडिओ शेअर करताना, प्रॉडक्शन हाऊसने म्हटले आहे की, सिनेमा लव्हर्स डे दिवशी तुम्ही 'मिस्टर अँड मिसेस माही'ची तिकिटे फक्त 99 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola