Jammu-kashmir Vidhansabha Rada : ठरावाची प्रत फाडली, जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम 370वरून राडा

Continues below advertisement

Jammu-kashmir Vidhansabha Rada :  ठरावाची प्रत फाडली, जम्मू-काश्मीर   विधानसभेत  कलम 370वरून राडा

जम्मू-काश्मीरला पूर्वीप्रमाणे विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या ठरावावरून विधानसभेत बुधवारी जोरदार खडाजंगी झाली. अतिशय गोंधळात पूर्वीप्रमाणे जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा ठराव चर्चेविना मंजूर करण्यात आला.

मात्र, भाजप सदस्यांनी या वेळी गोंधळ घालून ठरावाच्या प्रती सभागृहात फाडून टाकल्या आणि अध्यक्षांविरोधात घोषणाबाजी केली.

हे ही वाचा...

दिवंगत नेते प्रवीण महाजन यांची पत्नी सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यासह पंकजा मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. दोन्ही मुंडे बहीण भावाने संगनमताने धाक दाखवून आणि  कारस्थान रचून जबरदस्तीने कोट्यवधी रुपयांची जमीन अल्प किमतीत खरेदी केली असल्याचा आरोप सारंगी महाजन (Sarangi Mahajan) यांनी केला. प्रवीण महाजन यांच्या नावे असलेली बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यामधील मौजे जिरेवाडी येथील गट नंबर 240 मधील करोडो रुपये किमतीची 36.50 आर जमीन धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी जबरदस्तीने घेतली असल्याच त्यांनी म्हटले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले आहेत. सारंगी महाजन यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यावर आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे काय उत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram