Jammu Kashmir Doda Accident : डोडामध्ये बसचा भीषण अपघात, पंतप्रधान मोदींनी घेतली दखल

Jammu Kashmir Doda Accident : डोडामध्ये बसचा भीषण अपघात, पंतप्रधान मोदींनी घेतली दखल

Jammu Kashmir Bus Accident : जम्मू काश्मीरमध्ये (Jammu & Kashmir) मोठी दुर्घटना घडली आहे. बस 250 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात (Bus Accident) झाला आहे. या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. जम्मू-काश्मीरच्या डोडा येथे बस दरी कोसळून ही भीषण दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातग्रस्त बसमध्ये सुमारे 50 प्रवासी होते, अशी माहिती समोर येत आहे. दुर्घटनास्थळी सध्या बचावकार्य सुरु आहे. 

जम्मू-काश्मीरमध्ये भीषण बस अपघात

किश्तवाडहून जम्मूकडे जाणाऱ्या बसला दोडा जिल्ह्यातील भीषण अपघात झाला आहे. प्रवासी बस आसार भागातील त्रंगलजवळ रस्त्यापासून 250 मीटर खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. माहिती मिळताच पोलीस दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola