Jammu and Kashmir Ganapati Utsav : ढोल ताशाच्या गजरात काश्मिरमध्ये गणपती बाप्पांच्या मूर्ती दाखल

Continues below advertisement

Jammu and Kashmir Ganapati Utsav : ढोल ताशाच्या गजरात काश्मिरमध्ये गणपती बाप्पांच्या मूर्ती दाखल

ही बातमी पण वाचा

Ganesh Chaturthi 2024 : लाडका बाप्पा येणार गं.. काय काय देऊ नैवेद्य! गणेशोत्सवात बाप्पाला 'हे' पदार्थ अर्पण करा, झटपट सोपी रेसिपी, सगळेच करतील कौतुक

Ganesh Chaturthi 2024 : गणेश चतुर्थीचा दिवस खूप खास मानला जातो. या दिवशी गणपतीची पूजा केली जाते आणि त्यांचे आगमन मोठ्या थाटामाटात साजरे केले जाते. या दिवशी भक्त गणपतीची मूर्ती घरी किंवा सार्वजनिक मंडळात ठेवतात. हे 10 दिवस अगदी आनंदाचे, भक्तिभावाचे असतात. या वेळी लोक एकमेकांना भेटतात, एकत्र जेवतात, आणि याचंच निमित्त साधून घरी विविध खाद्यपदार्थ तयार केले जातात.

लाडक्या बाप्पाला नैवेद्य म्हणून हे पदार्थ अर्पण करा

गणेशोत्सव हा 10 दिवस मोठ्या उत्साहात साजरा होतो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्याची सांगता होते. तुमच्या घरातही गणेश चतुर्थी मोठ्या थाटामाटात साजरी होणार हे नक्की. पूजा झाली की भाविक आपल्या बाप्पाला नैवेद्य दाखवतात. अनंत चतुर्दशीच्या दिवशी भाविक गणपतीच्या मूर्तीचे समुद्रात विसर्जन करतात. हा विसर्जन सोहळा अतिशय भव्य आणि भावनिक असतो. देवाची 10 दिवस काळजी घेतली जाते आणि पूजा केली जाते आणि विविध पदार्थ अर्पण केले जाते. तुम्हालाही लाडक्या बाप्पाला नैवेद्य अर्पण करायचे असेल, तर तुम्ही आम्ही सांगितलेले पदार्थ देऊ शकता. गणेशोत्सवात खास पदार्थ म्हणून काय तयार करता येईल ते सविस्तर जाणून घेऊया.

रसकदम

ही बंगालची प्रसिद्ध स्वीट डिश असली तरी तुमची इच्छा असेल तर ती श्रीगणेशाला अर्पण करता येते. त्यात रसगुल्लासारखा छोटा गोळा असतो, जो खव्याच्या किंवा माव्याच्या थराने झाकलेला असतो. त्याच्या वरच्या भागावर खसखस ​​असते. त्यामुळे याला खोयाकडम असेही म्हणतात. काही लोक ते वेगवेगळ्या चवींनी बनवतात. विशेषत: सणांच्या दिवशी हा गोड पदार्थ बनवला जातो. ही स्वीट डिश पश्चिम बंगाल तसेच पूर्व-भारतीय राज्ये आणि बांगलादेशमध्ये खूप लोकप्रिय आहे.

मोदक

मोदक हा गणपतीच्या सर्वात आवडत्या प्रसादांपैकी एक मानला जातो. हा पदार्थ तांदळाचे पीठ, नारळ, गूळ आणि तूप यापासून बनवला जातो. तुम्ही वाफवलेले किंवा तळलेले मोदक बनवू शकता. मोदकाच्या आतील सारण हे ताजे किसलेले खोबरे आणि गूळ यांचे बनलेले असते. तसं पाहायला गेलं तर मोदक बनवण्याची प्रत्येकाची स्वतःची पद्धत असते. मोदक मऊ असावेत याची काळजी घेतली जाते, कारण तांदळाच्या पीठापासून बनवलेले मोदक मऊ असावेत. असे म्हटले जाते की जेव्हा गणपतीचा दात तुटला तेव्हा त्यांच्यासाठी मोदक बनवले गेले. मोदक मऊ असतात, त्यामुळे ते चघळण्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही.

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram