Jalna OBC Morcha | ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे : महादेव जानकर
जालना : जालना येथे ओबीसी समाजाच्या वतीने आज भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. जनगणनेत ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करून, लोकसंख्येच्या प्रमाणात केंद्र शासनाने आरक्षणाची अंमलबजावणी करावी. ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागू नये, नॉन क्रिमीलियरची अट रद्द करावी यासह इतरही अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.