Jalna Heavy Rain : जालन्यात पावसाचा कहर, बदनापूर आणि अंबड तालुक्यातील सुखना नदीला पूर ABP MAJHA
Continues below advertisement
जालना जिल्ह्यात बदनापूर आणि अंबड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सुखना नदीला मोठा पूर आला आहे. वाकुळणी आणि माहेर भायगाव परिसरातून वाहणाऱ्या सुखना नदीचे पाणी शेती पिकांमध्ये शिरले आहे. यामुळे सोयाबीन आणि कपाशीचे पीक मोठ्या प्रमाणावर पाण्यात बुडाले आहे. बदनापूर आणि अंबड तालुक्यात अनेक शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मराठवाड्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी रस्ते जलमय झाले असून अनेकांच्या घरांमध्ये आणि शेतींमध्ये पाणी शिरले आहे. "दहाबारा जनावरे देखील गेल्या दोन दिवसांत दगावली आहेत." ही परिस्थिती ड्रोन दृश्यांमध्ये एबीपी माझाच्या माध्यमातून दिसत आहे. घनसावंगी आणि अंबड तालुक्यात पाऊस कायम आहे. गोदावरी नदीत विसर्ग वाढल्यामुळे आजूबाजूच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मध्यरात्री परतूर तालुक्यातील एका गावात पाणी शिरले होते. कालच्या तुलनेत पाऊस कमी असला तरी धोका कायम आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement