Jalna Couple Molested | राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा : प्रवीण दरेकर | ABP Majha
मन सुन्न करणारी धक्कादायक घटना पुरोगामी महाराष्ट्रात घडली आहे. जालन्यात चार जणांच्या टोळक्याने एका प्रेमीयुगुलाला बेदम मारहाण करुन तरुणीचा विनयभंग केला. चीड आणणारी गोष्ट म्हणजे या टोळक्याने प्रेमीयुगुलाला मारहाण करतानाचा व्हिडीओ बनवला. व्हायरल होणारा हा व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती लागला. यानंतर एबीपी माझाने हा व्हिडीओ जालन्याच्या पोलीस अधीक्षकांकडे सोपवला. विशेष म्हणजे हा व्हिडीओ मिळेपर्यंत पोलिसांनाही या घटनेची कल्पना नव्हती.