Jalna Accident | बस-कंटेनरची समोरासमोर धडक, 2 प्रवासी जागीच ठार, 20 प्रवासी जखमी

Continues below advertisement

Jalna Accident | बस-कंटेनरची समोरासमोर धडक, 2 प्रवासी जागीच ठार, 20 प्रवासी जखमी

हे ही वाचा..

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत चर्चेचा विषय ठरत असलेल्या कुर्ला बस अपघाताविषयी आता नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. या भीषण अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला होता. तर जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. काही जखमींना अपंगत्व आले आहे. अशातच कुर्ला बस अपघातावेळचा (Kurla Bus Accident) सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये बसचा चालक संजय मोरे (Sanjay More) हा अपघातानंतर बसमधून कशाप्रकारे बाहेर पडला, हे दिसत आहे.

कुर्ल्यातील एलबीएस रोडवर सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात घडला. इलेक्ट्रिक बस सात ते आठ वाहने आणि लोकांना चिरडत गेली. यावेळी बस प्रचंड वेगात होती आणि त्यामध्ये अनेक प्रवासी होती. इलेक्ट्रिक बसने वाहनांना धडका द्यायला सुरुवात केल्यानंतर बसच्या आतील प्रवाशीही प्रचंड घाबरले होते. बस भरधाव वेगाने वाहनांना धडका देत असताना आतील प्रवासी जीव मुठीत धरुन बसले होते. काही प्रवासी सीटला घट्ट धरुन शेवटपर्यंत बसून राहिले. तर उभ्या असलेल्या प्रवाशांनी हँडल्स आणि जो आधार मिळेल त्याला पकडले होते. प्रत्येक वाहनाला धडक दिल्यानंतर बसच्या आतमध्ये मोठे धक्के बसत होते. यावेळी प्रवाशांच्या चेहऱ्यावरची प्रचंड भीती सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram