Jalgaon: वडिलांच्या पुतळ्यासमोर घेतले सात फेरे ABP Majha
जळगावात काळजाला भिडणारी घटना घडलीय. पाचोरा इथल्या नानद्रा गावातील लेक वडिलांच्या पुतळ्यासमोर सात फेरे घेत लग्नबंधनात अडकली. माजी सैनिक भागवत पाटील यांचं काही महिन्यांपूर्वी कोरोनामुळे निधन झालं. वडिलांच्या निधनामुळे त्यांची लग्नात उणीव भासणार याची हुरहूर वधू प्रियंका पाटील हिला लागली होती. त्यामुळेच आपले वडील आपल्या विवाहात हजर राहावे, त्यांची उणीव भासू नये यासाठी प्रियंकाने चक्क वडिलांचा हुबेहूब पुतळा तयार करण्याचा निर्णय घेतला. याला तिच्या कुटुंबीयांनी पाठिंबा दर्शवला. त्यानंतर दोन लाख रुपये खर्च करुन प्रियंकाने कारागिरांकडून वडिलांचा पुतळा बनवून घेतला. लग्नात वडिलांच्या पुतळ्याचे आशीर्वाद घेऊन प्रियंका लग्नाच्या बेडीत अडकली. बाप-लेकीच्या प्रेमाची साक्ष देणाऱ्या या अनोख्या विवाह सोहळ्याची सध्या चर्चा रंगलीय.
Tags :
Jalgaon Support Attendance Pachora Nandra Fere Lagnabandhan Ex-Serviceman Bhagwat Patil Hurhur Bride Priyanka Patil